background

माझे आजोबा

मूळ गाव – हिंगोली, जिल्हा परभणी, मराठवाडा

जन्म – १३ मे १९२२

शिक्षण – एम. ए. – १९४३ साली मेट्रिक

१९५८ – वयाच्या ३६व्या वर्षी बी.ए. ची पदवी

१९६६ – एम.ए. ची पदवी

नोकरी/व्यवसाय – १९८० साली विक्रीकर अधिकारी म्हणून निवृत्त – नोकरी निमित्ताने हिंगोली, परभणी, औरंगाबाद, नागपूर व मुंबई या ठिकाणी कार्य

छंद/आवड – नाट्यप्रेमी, साहित्याची आवड, वाचनाची आवड, अभ्यासू वृत्ती, गप्पा मारणे, ऐतिहासिक घटना सनावळीसह जपणारे, रंजकतेने व्याख्यान खुलविणारे, मुखोद्गन असलेले, विनोदीवृत्ती जपणारे, पुस्तकाच्या प्रकाशानासह अनेक ठिकाणी व्याखाने, ज्येष्ठ नागरिक संघ, मुंबई-नागपूर-औरंगाबाद येथील पदवी महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, सुंदर व सुवाच्य हस्ताक्षर, लेखनाची आवड, ‘नागपूर पत्रिका’ या वर्तमानपत्रात स्तंभलेखन. ‘रोज पन्नास पाने वाचणारच’ ही घेतलेली शप्पथ अंतिम श्वासापर्यंत पार पाडणारे.

स्वप्नांवरचा अजून बराच अभ्यास करावयाचे स्वप्न अर्ध्यावरच सोडून गेलेले माझे आजोबा यांच्या वयाच्या ७५व्या वर्षी रौप्यमहोत्सव व २००४ साली ८१व्या सहस्वचंद्रदर्शन सोहळा संपन्न झाला. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या लेखक, व्याख्याता, वक्ता, विनोदाचार्य आजोबांचा मृत्यू दिनांक २४ नोव्हेंबर २००६ साली झाला.

टीप: आजोबांनी लिहिलेल्या या पुस्तकाला १९८९ साली छापील स्वरुपात प्रकाशित करताना अनेकांचे हातभार लागले. मा. श्री. श्या. श्री. बनहट्टी यांच्या श्रीनिवास मुद्रालयात याचे मुद्रण झाले तर प्रकाशनाचा भार ज्ञानेश प्रकाशनाच्या प्रकाशक मा. सौ. शैलजा काळे यांनी सांभाळला. “स्वप्नांचा दुनियेतील” सर्व गोष्टीचा परामर्ष घेऊन या पुस्तकातील स्वप्न्शास्त्राला लिखित पाठींबा मा. प्रा. श्री. अ. ना. देशपांडे यांनी आपल्या प्रस्तावनेतून दिला. या साऱ्यांच्या सहकार्यामुळेच आजोबांचे पुस्तक छापील स्वरुपात प्रसिद्ध होऊ शकले. आज या सर्वांच्या मुळेच मला ही वेबसाईट तयार करता आली. आपले आशीर्वाद पाठीशी आहेतच. मी आपला सर्वांचा मनापासून ऋणी आहे.

आता संपूर्ण पुढील भाग आजोबांच्या छापील पुस्तकाप्रमाणेच.

– श्रेयस अनिल डोईफोडे