background

स्वप्नदृश्य व स्वप्न्फल

आतापर्यंत आपण डॉ. सिगमंड फ्राईडचा सिद्धांत मान्य करूनही, त्याला डावलून पूर्वीपासून प्रस्थापित झालेल्या प्रतीकाचे परिणाम बघू शकलो. इजिप्शियन वाङ्मयात स्वप्नात दिसणाऱ्या सर्व वस्तूंची भाकीतं सर्वप्रथम आली आहेत. स्वप्नात दिसणाऱ्या सर्व वस्तूंची भाकीतं हि कोणा एका व्यक्तीची स्वप्ने नव्हेत. तर पुन्हापुन्हा पडणारी सारखी स्वप्ने आणि त्यांचे सारखे परिणाम हे लक्षात आल्यावर त्याची नोंद घेण्याची पद्धत सुरु झाली आणि आज त्याचा कोश इंग्रजीत तसाच इतर भाषांतही तयार झाला आहे. मराठीत तशाच प्रकारची डिक्शनरी तयार करण्याचे प्रयत्न होत आहे. स्वप्न या विषयावर एका रशियन भाषेत चाळीस हजार स्वप्नांचा संग्रह केला आहे.

या भागात स्वप्नदृश्य आणि त्याचे फल दिले आहे. वास्तविक स्वप्न्दृष्याचे फल पाहण्याची फार थोडी गरज लागते. एक वेळ तुम्हास स्वप्नाचे विश्लेषण करून त्यावर थोडे चिंतन, मनन करता आले तर डिक्शनरी न बघताही तुम्ही पुढे काय होऊ शकतं हे काही दिवसाच्या सरावाने सहज अचूक समजू शकता. कारण स्वप्न हि सर्वस्वी एका व्यक्तीचीच बाब आहे. तीच व्यक्ति जास्त अधिकाराने स्वप्नफल समजू शकते. इतरांच्या स्वप्नात डोकाव्ण्याकर्ता ते स्वप्न पडणाऱ्याचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करूनच त्याचे फळ काढण्याचा प्रयत्न अभ्यासाशिवाय जरा कठीण. तेव्हा अगोदर आपल्या स्वप्नाचेच विश्लेषण करून किती टक्के यश मिळतं ते पाहा.

यातील दृष्यावस्तू या फक्त मार्ग दाखवणाऱ्या किंवा असं म्हणू की सूचनेच्या पाट्या आहेत. खालील प्रत्येक वस्तू किंवा दृश्य हे त्या त्या व्यक्तीची उन्नती-अवनती, पदोन्नती, पदावनती याचे द्योतक आहे. व्यापारी वर्गास जर “भर-भराट” होईल तर त्याच किंवा तशाच स्वप्नास सरकारी नोकरास पदोन्नती मिळेल, अशा रीतीने हि स्वप्न्फलं आहेत. वाचकांनी ताडून पाहावीत. अधोरेखित स्वप्नदृश्य आणि स्वप्नफल हि सर्वसामान्यांच्या अनुभवास आलेली आहेत. म्हणून याची फलं शंभर टक्के तीच आहेत यात शंका नसावी. यात खोगीरभरती करण्याचे टाळले आहे.

कोणा एका मराठी छांदिष्टाने थोर मोठ्यांच्या आयुष्यातील स्वप्ने गोळा केली तर स्वप्नदृश्य आणि स्वप्न्फलास निश्चितच पुष्टी मिळेल. मला उगीचच राहून राहून वाटलं की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. शरद पवार यांना पहिल्या प्रथम मुख्यमंत्री होण्यापूर्वी निश्चितच काहीतरी सूचक स्वप्न पडले असेलच. तसेच माजी मुख्यमंत्री श्री. अंतुले यांना पण पायउतार होण्यापूर्वी निश्चितच तसे सूचक स्वप्न पडले असेलच. तसेच विद्वान व तरुणात लोकप्रिय असलेले माजी मंत्री श्री. जिचकार यांना पण मंत्री होण्यापूर्वी आणि मंत्रिपद जाण्यापूर्वी निश्चितच काहीतरी सुचना स्वप्नामार्फत मिळाली असेलच. स्वयंस्फूर्तपणे मोठ्या माणसांनी आपले अनुभव कळवल्यास या शास्त्रास हातभार लावण्याचे श्रेय मिळेल. तेव्हा सर्वांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी या छंदास प्रोत्साहन देऊन यातील स्वप्नफल आणि स्वप्नदृश्य यास बळकटी येईल असे अनुभव कळवावेत.

स्वप्नदृश्य

स्वप्नफल

अग्नीवर वस्तू शिजवने, अग्नी, अग्नी पेटवलेला पाहणे उद्योगधंद्यात लाभ, सर्व काळजी दूर होणे.
 अंडी खाणे  त्रास नाहीसा होणे, आनंददायक घटना घडणे.
 अंधारकोठडी पाहणे, अंधारी रात्र पाहणे,  चैन जन आपत्ती येणे, विपन्न अवस्था प्राप्त होणे.
 अश्व (घोडा)  अत्यंत शुभदायक. आर्थिक स्थैर्य, भरभराट आणि उन्नती निश्चित. नोकरी करणार्यास पदोन्नती.
 अन्न दर्शन – अन्नदान  कार्यसिध्दी
 आग लागणे, आगीचा डोंब  लक्ष्मीचा वरदहस्त, मोठा सांपत्तिक लाभ.
 आकाश, आकाशात उडणे सुखकारक, वैभव वाढ, आजारातून मुक्तता.
आकाशातून पडणे संपत्ती नाश, संकट येणे.
आंगठी विकणे स्त्री विरह-दुःख
आड खोडणे  सुरु केलेले काम पूर्ण होणे.
आंघोळ करणे दुःख नाहीसे होणे.
आरसा चांगले मित्र मिळणे – उर्जित अवस्थेकडे वाटचाल.
आरसा फुटणे नातेवाईकाचा मृत्यू
आंब्याचे झाड, पिकलेले आंबे, आंबा खाणे धनार्जक, वैभवाकडे निश्चित वाटचाल
आई-वडील सुखकारक, भाग्यवर्धक
आंबट पदार्थ खाणे अपाय-धोका
आंधळा आजारीपण
आगबोटीत बसणे, जलपर्यटन, आगबोट स्वतः चालवणे शुभकारक, धंद्यात भरभराट, उन्नती
आरशात प्रतिबिंब दिसणे, पाहणे प्रेमभंग-तोंडाला काळिमा लागणाऱ्या गोष्टी घडणे.
इस्त्री करणे नोकरीत बढती, अविवाहितांचे विवाह.
उंदीर दिसणे भांडणे, मानसिक त्रास
उंट, उंटावर बसणे, फिरणे अडचणी, विवंचना, अपमान आजार उद्भवणे.
उवा शरीरास आजार
कोळसा संधी गमावणे किंवा संधी मिळून देखील यश न येणे.
कावळा दुःख, दुर्दैव, भांडणे
कावळा डोक्यावर बसलेला ज्याच्या डोक्यावर बसला असेल त्याचा मृत्यू, सामान्यतः सात वर्षात निश्चित. स्वप्न वेळ काढल्यास त्या प्रमाणे.
ओढा शुभ फलदायक
ओकारी शुभ फलदायक
ओटीत नारळ घालणे कल्याण, शुभविवाह, पुत्र प्राप्ती
कपिला गाय ज्ञान प्राप्ती, काळ्या रंगाची गाय दिसल्यास मंगलकार्य होणारच.
कोळी, कोळ्यांनी जाळे विणणे धनसंग्रह – सुखोपभोग
कबुतर संकटाची पूर्वसूचना
कोकिळा भरभराट
किडा, किडे अंगावर बसणे भाग्योदय, उर्जितावस्था
केस गळणे-कापणे सुबत्ता निघून जाने, मानहानी, विपन्नावस्थेकडे वाटचाल.
कमळ सुख समाधान, भाग्यवर्धक
कापूस अत्यंत अनिष्ट फळदायक, हातून अशा चुका होतील कि ज्यामुळे मानसिक अवस्था पूर्णपणे नष्ट होईल.मानखंडणा आपोआप आलीच.
काळा रंग, काळे रंग, काळे वस्त्र हा रंग अनिष्टकारक आहे हे सर्वांनाच माहित आहे.
करवंटी रसातळात जाणे
केळी, केळ कार्यसिद्धी
केरसुणी, केरसुणीने केर काढणे-झाडणे त्रासदायक घटना घडून बेकार खर्च होणे.
कोणी रडलेले बघणे शुभ समाचार समजणे
केस घेणे देता देता मृत्यू
कापलेला हात दुःख येऊन त्यातून मुक्तता
कोणी सिंहासनावर बसलेला पाहणे कोणतेही काम पूर्ण होणे
कोणाबरोबर भांडणतंटा ख़ुशी व सौख्य
कोणी वैद्य – डॉक्टर पाहणे भारी दुःख यातना
कुत्रा दिसणे शत्रुत्व, विरोध होणे
कुत्र्यास ठार मारणे व्यवसायात भरभराट होणे
केशरी रंगाच्या वस्तू पाहणे शुभकर्मे – कुटुंब वृद्धी
खटाऱ्यात बसणे शुभफलदायक-धनलाभ
खारट पदार्थ खाणे महत्त्वाचे कार्यात सुयश
ख्रिसमस, ख्रिस्त, ख्रिश्चन पाहणे उत्तम मित्र मिळणे, शक्तिशाली संरक्षण, दया, परोपकार यांची वाढ होणे.
खणणे सत्ता, लॉटरी, गुप्तधन मिळण्याचा योग
खोल विहीर पाहणे चिंता प्राप्ती, घसरण सुरु होणे
खाली उतरणे अपकार्य, परागती, अधःपतन
गाईने हल्ला करणे धंद्यात हानी
गरुड, गरुडझप आकांशा वाढणे, फलदायक कीर्ती
गंधाचा लेप लावणे उत्पन्नात वाढ होणे.
गाणे पाहणे, ऐकणे तंटा, मन-स्वास्थ्य बिघडणे, फटका
गहू दिसणे उत्कर्ष, भरभराट
गाण्याची मैफिल झडणे कार्यसिद्धी लांबणीवर पडणे
गाय पाहणे, त्यातल्या त्यात काळी अत्यंत शुभ. लग्नकार्य होणार हे निश्चित
गाढव दिसणे बेअब्रू, कष्टप्रद यातना
गाढव ओरडणे फायदा होणे
ग्रह निखळून पडणे घोर शोक, मृत्यू
गुलाब फुल सुखसमृद्धी
ग्रहण दिसणे अडचणी दूर होणे
गढूळ पाणी दिसणे आर्थिक अडचणी येणे
ग्रंथ दिसणे ज्ञानात वाढ होणे
ग्रंथ वाचणे अंदाज चुकणे
घोडा, घोड्यावर बसणे, चढणे, पांढरा काळा, नटलेला, रेसचा वेगानी धावणारा कुटुंब वृद्धी, राजमान्यता, मान-सन्मान, भरभराट, सतत उत्कर्ष, रोगमुक्तता, उन्नती निश्चितच
घोड्यावरून पडणे वैभावनाश, पश्चाताप
घर दिसणे उन्नती होणे
चर्च, चर्चची घंटा वाजणे शुभ वार्ता, जिव्हाळ्याचे वातावरण
चंद्रास्त, चंद्र निस्तेज दिसणे घोर शोक, मृत्यूयोग
चंद्र ग्रहण, चंद्र दिसणे सर्व क्षेत्रात सुयश. संकटातून मुक्तता, आजारातून बरे होणे, समाधानाचा काळ
चंद्र ढगाने व्यापणे, अंधुक दिसणे प्रकृती बिघडणे, प्रेमाचा बाबतीत विघ्न येणे
चाकू दिसणे मित्राबरोबर खटके
चेंडू दिसणे खोटा आरोप येणे
चपला(जुन्या) दिसणे अडचणी – मनोभंग
चपला(नव्या) दिसणे उत्तम दिवस
चांदी दिसणे, गोळा करणे सौख्यावर्धक, चैन
चिलीम पिणे, ओढणे धनवान होणे.
छत्री उघडून चालणे, डोक्यावर धरणे अशक्य कार्य तडीस जाणे, मानमरातब व ऐश्वर्यवाढ, आरोग्य, धनवाढ.
जोड(जुना-फाटका) अडचणी उत्पन्न होणे.
जिना चढून जाणे कौटुंबिक उत्कर्ष, प्रगती, उन्नती
जिना उतरणे घसरण सुरु होणे
जेवणावळी दिसणे संकटे, चिंता, आर्थिक अडचणी
जेवण करणे किरकोळ आजार येणे
जमिनीवर बिछाना अंथरणे आरोग्य प्राप्त होणे, आर्थिक प्रगतीकडे वाटचाल
जंगल(हिरवे) दिसणे आनंदाचे क्षण येणे, शोक दूर होणे
जांभूळ दिसणे-खाणे सर्व त्रासातून मुक्तता
जळता दिवा सुकलेला बाग समृद्ध होणे, पुत्रसंतती होणे.
जननेन्द्रिय दिसणे मनकामना पूर्ती, भरभराट
पुरुषाचे जननेन्द्रिय वाजवीपेक्षा मोठे दिसणे आर्थिक अडचणीतून निश्चित मुक्तता
जलविहार, जलक्रीडा ध्येयप्राप्ती, प्रगती
झाड समृद्धीकारक
झाडावर चढणे रोगमुक्त होणे, अभ्युदय्कारक
झाड तोडणे नुकसानीस तोंड द्यावे लागणे
झेंडा (पांढरा) प्रसन्नता प्राप्ती
झेंडा (हिरवा) समोर कठीण प्रसंग येणे
झेंडा (लाल) आराम नाहीसा होणे
टेकडीवर चढून जाणे परीक्षेत यश, उज्ज्वल पराक्रम, धाडशी कार्यात यश
टांगा स्वतः हाकणे, प्रवास अनुकूल वातावरण
टोपी(घाणेरडी) इतरांच्या डोक्यावर किंवा स्वतःच्या डोक्यावर पाहणे संपूर्ण जीवन उन्नती, सरकारी नोकरास पदोन्नती निश्चित, इतरास अत्यंत भरभराटीचे दिवस. मानमरातब मिळणारच.
टोपी दुसऱ्याने डोक्यावर आणून ठेवणे अनर्थ, फसवणूक
डाकघर राहत्या जागेत बदल
डोळ्यात अंजन घालणे, सुरमा, काजळ मृत्यूकडे वाटचाल
डोंगरावर चढणे, फिरणे नोकरीत मोठी जागा मिळणे, दिवस भरभराटीचे येणे
ढगाळ आकाश, ढग दिसणे दुर्दैव सूचक, संकट येणे
तलाव दिसणे, पोहणे, पडणे शुभफलदायी, भरभराट
तलावात उडी मारणे नुकसान, खोटे येणे, धोका
तलावात लाटा व तरंग दिसणे निःसंशय संकटाची सूचना
तेल मर्दन करून घेणे शस्त्रभय, अपघात, आजार
तारे दिसणे संकटातून मुक्तता
तूप पिणे, तूप प्राप्ती दीर्घायुष्य, सर्व कार्यात यश
टाक पिणे, दिसणे, मिळणे नुकसान, अपघात, बेअब्रू
तलवार (नंगी) हाती धरणे शत्रूवर विजय मिळवणे
तोफ पाहणे शत्रुनाश, विजय मिळणे
तंबोरा वाजवणे भरभराट होणे
तुम्ही कोणावर रागावणे सुकलेले मन प्रसन्न होणार्या घटना घडतील
ऑफिस बघणे जिकीर पैदा होणे
देवालय, देवळावर चढणे, देऊळ उत्कर्ष, वैभव
दात पडलेले बघणे अत्यंत वाईट स्वप्न, सर्व पैसा जावून मनुष्य धुवून निघतो.चांगला दिसणारा व असणारा मनुष्य चुकीच्या मार्गाला लागून सर्वनाश ओढवून घेतो.एवढं तरी बरे आहे की यात फक्त पैसाच जातो. स्थावर इस्टेट विकल्या जातात.
 दाढी करणे मानहानी निश्चित होणार
दुध, दुध पिणे, दही मिळणे, पिणे सर्वत्र आनंदी आनंद, मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ
दिवा भाग्योदय
दिवा विझणे आयुष्यात अंधार येण्यास सुरुवात
दफनविधी संपत्ती प्राप्ती
धूर दिसणे, धुरात गुदमरणे उपद्रव, नुकसान, मृत्यूची चाहूल
धार्मिक समारंभ महत्वाचा उत्कर्ष
नदी नाला, यात पोहणे शुभ फलदायी
नदीत लाट, तरंग, उडी मारणे, लोंढ्यातून जाणे, भोवरा दिसणे, लाटा अंगावर येणे संकटाची पूर्वसूचना, भांडण, बेबनाव, नुकसान, मानहानीचे प्रसंग येणे
न्हावी दिसणे कर्जबाजारी होणे, अशुभ सूचक
नागदर्शन फना काढून ताठ उभे राहणे, तक लावून पाहणे, मागे धावणे, न चावणे दैवी कोप, कुलदैवत कोप, कामात विघ्न येणे, यश न मिळणे, मनःस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडणे
साप चावणे सहसा साप स्वप्नात चावत नाही. पण चावल्यास निःसंशय उत्कर्ष, जय, अमाप पैसा मिळतो. स्थावर इस्टेट होते. मानमरातब, सर्व बाजूनी उत्कर्ष. हेवा करण्याइतकी प्रगती होते.
गरोदर स्त्रीस साप चावल्याचे दिसल्यास मुलगा होतो
मलूल पडून राहिलेला दिसल्यास मुलगी होते
नातेवाईक दिसणे शुभदायक
नारळ ओटीत घालणे, नारळाचा प्रसाद, नुसते नारळ शुभ विवाह, पुत्रप्राप्ती, नशीब उगवते, सर्व कार्यात यश
नारळ फोडणे, फोडलेले पाहणे मानखंडणा होणे, सुखाचे तुकडे होणे, अपघात, कटकटी स्वास्थ्य व मनःस्वास्थ्य बिघडविणाऱ्या घटना घडतात.
न्हाव्यांनी दाढी करणे, हजामत करणे, मर्दन करणे अपघात, खोट, व्याधी, अब्रूचे धिंडवडे निघणे.
पाणी दिसणे, पोहणे, पडणे व स्नान अत्यंत शुभदायी
पाण्याच्या लाटा अंगावर येणे, पाण्यात उडी मारणे, लौंढा, प्रवाह व पाण्यात चालत जाणे अत्यंत अशुभ, नुकसान, भांडण तंटे, नातेवाईकाशी बेबनाव, कलह, कटकटी.
पर्वतावर चढून जाणे प्रगतीचे दिवस येण्याची पूर्वसूचना
पिताजी दिसणे, बोलणे सौख्यकारक
पांढरी फुलं सुख आणि आनंदात भर
पोष्ट ऑफिस राहत्या जागेत भर
पोष्टमन विचित्र घटनेची पूर्वसूचना
पत्र दिसणे, पत्र येऊन पडणे शेजाऱ्याशी भांडण, मित्र व जवळच्या नातेवाईकाशी खटके उडणे.
प्रेत व प्रेतयात्रा दिसणे अडचणीवर मात, लाभास अनुकुलता
पाल मनात गोंधळ निर्माण होणे.
पक्षी दिसणे, गाणे गात असणे सुबत्ता, सर्वोतोपरी सौख्य
पोळी खाणे, पान खाणे, दिसणे आरोग्य, आजारातून बरे होणे
पोळी भाजणे, पाव कापणे, भाजणे दुर्दैव, मनःस्वास्थ्य बिघडणे
पांढरा झेंडा दिसणे गुरुकृपा होईल. प्रसन्नेत भर
पेढे खाणे भरभराट, आनंदत भर
पावा वाजवणे दुःख प्राप्त होणे, क्लेशकारक
फळे, फुले, फळ आलेले झाड, फुले असलेले झाड(जोड्फळ सोडून) यशाचे वाटचाल, वैभवप्राप्ती, इच्चा पूर्ण होणे, समृद्धीत वाढ
फुटका आरसा हलाखीचे दिवस येण्यास प्रारंभ
बंदुकीचा वायबार प्रिय व्यक्तीस, जवळच्या नातेवाईकास जिवावरचा आजार
बंदूक उडविणे त्रासदायक घटना घडणे
बैलावर बसणे शुभफलदायक, परीक्षेत यश
बेडूक दिसणे स्फूर्तीदायक घटना घडणे
भजी खाणे विजय प्राप्ती
भटजी नुकसान, फटका निश्चित बसणार
भांडणात कत्तल होणे अधिकारप्राप्तीचा योग
भडाग्नी दिसणे, ज्वाळा प्रेतास भडाग्नी देणे पराकोटीची उन्नती, आयुष्य बदलून जाणे
भात खाणे बेअब्रू, छी, थू होणार्या घटना घडणे
मीठ पाहणे महत्त्वाच्या कार्यात यश
मांजर ठार मारणे धनवृद्धी, व्यवसायात भरभराट
मार्ग न सापडणे अनिष्ट फलदायक
माता दिसणे उन्नतिकारक – कृपा
आदरणीय स्त्रीशी(मातेसमान) व्यभिचार केल्याचे दिसणे हे स्वप्न अति भयाण असून मनुष्य घाबरून जातो. पण जुन्या शास्त्राप्रमाणे हे अत्यंत शुभ आहे.जे अतिसंकात माणसावर आहे त्यातून निश्चित मुक्तता होते. शिवाय आयुष्यात प्रगतीच होते.
मांस दिसणे, खाणे धनलाभ
मद्यपान करणे आरोग्यास धोका, प्रकृती ढासळणे.
माता दिसणे यश. अमाप पैसा मिळणे.
मासे पकडणे, मारणे फसवे मित्र भेटणे, फसवेगिरी
मोर दिसणे आर्थिक परिस्थितीत खूप सुधारणा
मोटार स्वतः चालविणे प्रतिकूल वातावरणावर मात, प्रगतीकडे वाटचालआयुष्य सरळ सुखी जात राहिल
महारोगी निश्चित अर्थलाभ
मुंगी, मुंगळा दिसणे विपत्ती येणे, यश न मिळणे
मंदिरातील घंटा वाजणे, मूर्ती न दिसणे, हसणे, बोलणे भाग्योदय, उत्कर्षाकडे वाटचाल
मीठ खाणे कार्यात यश मिळणे
मोहरी दिसणे चिंतावाढ
मिरच्या दुर्दैवी घटना
रडलेले पाहणे(स्वतःस)तसेच इतरांनी रडणे आनंदाची वार्ता, पदोन्नती, मनोकामना पूर्ण होणे, प्रगतीकडे वाटचाल
राख दिसणे (पांढरी राखाडी) अत्यंत अशुभ, जवळच्या माणसाचा मृत्यू, नाना तऱ्हेची संकटे येणे, प्रसंगी फौजदारी खटलेसुद्धा चालणे.
रेस, रेसचा घोडा, रेस ग्राउंड  अत्यंत शुभदायक स्वप्न. आनंद, उत्साह याला उधान येईल. यशाने डोळे दिपून जातील. सर्वांगीण उन्नती व उत्कर्ष हे फळ दीर्घकाळ टिकणारे आहे.
रुमाल बांधणे समृद्धी
रत्ने दिसणे, धारण करणे सुखी जीवन जगणार याचे द्योतक ऐश्वर्यवर्धक समृद्धी
लोखंड दिसणे दुर्दैवी घटनेची नांदी, चुकीच्या मार्गास सुरुवात
लहान मुल रडतरडत जवळ येणे आर्थिक स्थैर्य, लाभ
लोणी काढणे, खाणे अचानक धनलाभ
लग्नाची वरात स्त्रीस आनंददायक, पुरुषास वाईट. पश्चाताप होईल अशा चुका हातून घडतील.
लढाईत कत्तल होणे, लढाई अधिकारप्राप्ती, सुखवृद्धी
विहीर दिसणे, पडणे चिंता, विपत्ती यात वाढ होणे.
विस्तव भाग्योदय होणार याची सूचना
विष्ठा, विष्ठा दिसणे, भक्षण करणे धनप्राप्ती, उत्पन्नात लक्षणीय वाढ होणे. हे स्वप्न केवळ आर्थिक लाभाचे आहे.
वांती शुभसूचक, क्षणिक अडचणीवर क्षणात मात.
विमानातून प्रवास करणे कार्यात विघ्न येणे
वाघ दिसणे, वाघाच्या तावडीतून सुटका होणे निर्भयपणा प्रखर होणे, रेस, लॉटरीत यशाचे योग.
वाघ चावणे शुभदायक घटना घडेल
विंचू दिसणे जय – पुत्रपौत्रवृद्धी – सुखात भर
वधू दिसणे, वर दिसणे अशुभ, कार्यात अपयश
दिवा विझणे आजार, अडचणीस सुरुवात, कटकटी
वानर, वानराचे पिल्लू शत्रुत्व, अपमानास्पद घटना घडणे. अपमानाची खिरापत
शिवलिंग दिसणे महत्त्वाचा उत्कर्ष, सुखी काळाकडे वाटचाल
शिडीवर चढणे निश्चित प्रगती. ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात प्रगती
शिडीवरून घसरणे आयुष्यात घसरणीला सुरुवात. हळूहळू सर्वस्वी पडेल
शर्यतीचा घोडा जीवनाच्या शर्यतीत हमखास यश
शौचास जाणे, शौच दिसणे, शौच करणे या स्वप्नाची वेळ काढल्यास तेवढ्या काळात निश्चित धनलाभ
समुद्र, सागर पाहणे, पोहणे, स्नान करणे, भरती आयुष्यात सुखाला भरती येणे
समुद्राची ओहटी सुखास ओहटी लागणे
सूर्यास्त, सुर्यपतन मृत्यूची चाहूल
सूर्योदय, सूर्यग्रहण, सूर्य व सोने दिसणे ज्ञानवृद्धी, एखाद्या विषयात विलक्षण प्रगती, धनलाभ
सासू-सासरा दिसणे संकटात वाढ
सिगरेट ओढणे योजना पूर्ण होतील. व्यापार्यास धंद्यात निश्चित लाभ होईल.
सुपारी कामात यश मिळणे कठीण
स्त्रीने जननेंद्रिय पाहणे मनकामना पूर्ण होणे. जे कार्य घेतले आहे त्यात १००% यश
स्कूटरवर बसणे, चालवणे, प्रवास करणे दूरचा प्रवास घडणे, आनंदात भर पडणे
हवेत उडणे आजारातून निश्चित बरे होणे, उशिरा का होईना, प्रगतीकडे वाट.
हत्ती दिसणे कार्यसिद्धी, मित्राचे सहकार्य लाभेल, अकल्पित यश
हागणे पैसा कमी न पडणे. आर्थिक स्थैर्य
हंस सुदैवास सुरुवात, दुर्वैवाचा अंत

काही अनुभवांचे स्वप्नफल

धुराचे इंजिन धुराचे लोट सोडीत अंगावर येणे अत्यंत मानहानीचे प्रसंग येणे, बदनामी होणे, उपहासाचा विषय होणे.
रेल्वेने प्रवास करीत असताना रूळ बदललेले पाहणे स्थानांतर – बदली निश्चित

टीप :- पुष्कळ वेळा स्वप्नात येणाऱ्या व्यक्तींची पुनरावृत्ती होते. तीच व्यक्ती येते आणि पहिल्यांदा ती व्यक्ती आल्यानंतर जो परिणाम होतो तोच ती दुसऱ्यांदा होतो. असे होतच राहते कारण ती व्यक्ती ती सूचना देण्याकरताच येते.

मला एका पटत एकाने लिहिले आहे “माझे वडील माझ्या स्वप्नात आले कि हमखास वाईट घटना घडते. वडील तिसऱ्यांदा स्वप्नात आले आणि माझी धाकटी मुलगी आठ दिवसात वारली. बहुदा माझे वडील वाईट घटना घडणार हे सुचविण्यास येत असावेत. आपण यावर असे का होते ते कळवावे.”

त्यांना उत्तर देऊन मी माझा तसाच अनुभव सांगितला. माझे मामा, मामाकडील वाडा, मामाच्या गावातील माझे मित्र हे माझ्या स्वप्नात आले की, आज कोणाशीतरी भांडण होणार, फटका बसणार, मनाचा तोल जाईल, अशा घटना घडतातच. येथे मामाचे स्वप्नात येणे हे दुर्दैवी घटना घडण्याचे आणि मनःस्वास्थ्य बिघडण्याचे प्रसंग येणार याची पूर्वसूचनाच आहे. तेव्हा शांतपणे अटळ गोष्टी सहन करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?

वाचकांनी अशा स्वप्नांची नोंद ठेवावी.

स्वप्न्शास्त्र एका दृष्टीक्षेपात

१. स्वप्ने ही स्वेच्छेने कधीही पडत नसतात. तेव्हा त्याची कारणे शोधण्याचा विनाकारण प्रयत्न पारू नका. शोधावायाचेच असेल तर त्यातील दृश्य का दिसले याचा शोध घ्या.

२. स्वप्नाचा इष्ट वा अनिष्ट परिणाम हा अटळ असतो याची नोंद घ्या व तो टाळण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. कारण निसर्ग आपल्या सूचना मानवाच्या दानानी किंवा देऊ केलेल्या मानानी(अर्थात मानभावी) बदलत नसतो.

३. डॉ. फ्राईडनी “स्वप्नात फक्त भूतकाळात दडवून  किंवा दाबून टाकलेल्या लैंगिक वासनांची भुते हि असतातच त्यात भविष्य नसतातच” असं अर्धवट सांगितलं आहे हे लक्षात घ्या. स्वप्नात भुते हि वेषांतर करून येतात तशी भविष्यकाळात घडणाऱ्या घटना सांगणारे दुतही येतात अर्थात वेषांतर करूनच.

४. नाटक बघत असताना आपण कोणत्या नटाने वेषांतर करून कोणते पात्र रंगवले हे जसे ओळखतो तसेच स्वप्नांतील वेषांतर ओळखता येते.

५. निसर्गाजवळ क्षमा नाही हे पूर्णपणे लक्षात ठेऊन सर्व प्रसंगास सामोरे जा. निसर्गाच्या सूचना डावलताच येत नाही म्हणून ही सूचना.

६. वाईट स्वप्नाची भीती बाळगू नका. कारण स्वप्नात वाईट नसतं. असतो तो परिणाम. भ्रामक कल्पनांना बळी पडू नका. तर्कशास्त्राच्या आधारावर वैचारिक बैठक बसवा.

७. स्वप्नात “उसको हटाव उसको बिठाव” अशा घोषणा व “ढमके पुरस्कृत – अमके तिरस्कृत” हे प्रकार नसतात. फक्त असतात त्या वैयक्तिक शुभ व अशुभ या घटनांच्या सूचना.

——————-

नोव्हेंबर १९८९ला पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर वर्तमानपत्रातून परीक्षण, अनेक वाचकांचे पुस्तकाबद्दलचे मत, स्वप्न, स्वप्न्शास्त्र याबद्दलची पत्रे आलीत सर्वांच्याच बद्दल सांगणे किंवा लिहिणे शक्य नाही पण काही थोडक्यात…

वर्तमानपत्रे – दै.सन्मित्र – स्वप्नांच्या दुनियेत – एक वाचनीयग्रंथ श्री. मोहन पाठक, ठाणे यांनी स्तम्भ्लेखनातून निवृत्तीनंतर अभ्यासाचा विषय म्हणून स्वप्नांची निवड करण्याचा श्री. डोईफोडे यांचे या निमित्ताने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. (दि. ९/९/९०)

‘स्वप्न’ – जिज्ञासू वाचकास आपल्या स्वप्नांचा अर्थ कसा लावला याविषयी मार्गदर्शन करणारे वाचनीय पुस्तक केवळ रु.२०/- (नागपूर पत्रिका – १२/८/९०)

मुंबई दिनांक – ८/४/९० – ‘स्वप्नसंबंधी मौलिक संशोधन’ – लेखकाने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वप्नांचा अर्थ लावणे सहज शक्य आहे. पुस्तक वाचनीय व वेगळा विषय हाताळण्याचे धाडस केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन (लोकसत्ता)

स्वप्नांचे गूढ उलगडून दाखविणारे पुस्तक – स्वप्नांची दुनिया – लेखकाने आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने या स्वप्न्शास्त्राचा उलगडा केला आहे. अभ्यास व लेखन दोन्ही ही गोष्टी अभिनंदनास पात्र आहे. – सौ. साठे (ग्रंथसहवास – १४/१/९०)

२ जानेवारी १९९४ – ‘स्वप्नसृष्टीचे ग्रांथिक अवलोकन’

‘मराठी साहित्य क्षेत्रात नवीन विषयावरील नवे पुस्तक म्हणून कौतुकास्पद’. यातील विवेचानाशी बुद्धिवादी सहमत होऊ शकणार नसले तरी क्षणभराकरिता स्वप्न्सृष्टीचे ग्रांथिक अवलोकन नक्कीच रंजक मानावे लागेल. पुस्तकातील चित्रांमुळे पुस्तक उठावदार झाले आहे.  डॉ. केनपुरे (लोकमत)

२७ दिसेम्बेर १९९७ – स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारे एक पुस्तक. स्वप्नांचा उलगडा करणारे व अर्थ सांगणारे मराठी भाषेतील एक वेगळे पुस्तक म्हणून कौतुकास्पद – प्रतिनिधी – दैनिक लोकमत – औरंगाबाद)

‘फ्राईडचे खंडण करणारी डोईफोडे यांची स्वप्नांची दुनिया’ – लेखकाने स्वप्न्शास्त्र एका दृष्टीक्षेपात सांगताना स्वप्नांची भीती बाळगू नका असा दिलासा दिला आहे. पुस्तक विवेचन अभ्यासपूर्ण म्हणून कौतुकास्पद परंतु आपल्या आपल्या पडलेल्या स्वप्नांचा अर्थ दिलेल्या कोषातून लपताना वाचकांना अंधविश्वासू बनू नये. – श्री. कुळकर्णी – श्रीमत दर्शन साप्ताहिक दि. १५-२२ २००४

——————-

वर्तमानपत्रे वृत्तपत्रे व मासिकांमधून अश्या प्रकारे परीक्षणे व समीक्षणे चापून आली. पुस्तके खरेदी करून वाचलेल्या वाचकांनी ताबडतोब आपल्या प्रतिक्रिया लिहून कळविल्यात त्यापैकी काही –

श्री. वा. रा. डोईफोडे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व परमार्थप्रवणता यांच्या सहवासात प्रत्यायात आली. ज्या ज्या लेखकांनी त्यापेक्षा वेगळे योग स्वतः निवडून मराठी सारस्वतात ‘स्वप्नांची दुनिया’ लिहून मोलाची भर घातली आहे. त्यांची प्रतिभाशाली कल्पकता आणि चौफेर वाचन याची साक्षही निर्मिती आहे – प्रा. श्री. व सौ. जोशी, नांदेड

डॉ. फ्राईडचे संशोधन आजचे निकष लावले तर सायंटिफिक नाही असे आजच्या मान्यता प्राप्त मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे तरी पण त्याला पूर्णपणे नाकारता येत नाही. ‘स्वप्ने हि भविष्यसूचक असतात’ असा आपला सिद्धांत व तो सिद्ध करण्यासाठी आपण काही उदाहरणे दिली आहेत. किंतु आपणही वापरात असलेली स्वप्नांचे अर्थ काढण्याची पद्धती ही पूर्ण पणे अचूक आहे असे म्हणता येत नाही. यासाठी आणखीन बरीच स्वप्ने अभ्यासण्याची गरज आहे. तरीसुद्धा आपण लिहिलेल्या या पुस्तकांमुळे मागे पडलेल्या स्वप्नशास्त्राच्या विषयाचा पुन्हा एखादा झाला. आपला प्रयत्न चांगला आहे पण अजून सविस्तर अभ्यास व्हावा – सौ. साधना कामत, मानसशास्त्रज्ञ, मुंबई

हैद्राबाद निवासी – उसमानिया विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख – प्रो.श्री.एस.आर.कुळकर्णी यांनी आपल्या १९९० सालच्या आपल्या पत्रानं ‘स्वप्नांची दुनिया’ या पुस्तकांबद्दल श्री. वा. रा. डोईफोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या पुस्तकाचा विषय व त्यासाठी केलेल्या प्रयत्नपूर्वक अभ्यासाचे श्री. कुळकर्णी यांनी पत्राद्वारे कौतुक केले. पुस्तकाचे वितरण ही लेखकाच्या दृष्टीने फार गरीब बनत चाललेली समस्या आहे आणि त्यात आपले पुस्तक व त्यात हाताळलेले विषय हा पण अत्यंत वेगळा विषय आहे.’ अशी काळजी पण या पत्रातून व्यक्त प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

‘स्वप्नांची दुनिया’ हे आपले पुस्तक संपूर्ण वाचले, आवडले व पटलेली माझ्या स्वप्नांचा पडताळासुद्धा आला. विशेष म्हणजे माझ्या संबंधित स्वप्नांविषयी आपल्या पुस्तकातील स्वप्नकोषातील स्वप्नदृश्य व स्वप्न्फल व दिलेले अनुभव आणि त्यानुसार मला मिळालेले उत्तर अगदी तंतोतंत जुळले. आपले पुस्तक खरोखरच योग्य मार्गदर्शन करणारे आहे, असे पत्राद्वारे श्री. भास्कर केवले जोगेश्वरी यांनी आपले या पुस्तकाचे मत कळविले होते.

आपले पुस्तक फारच आवडले. अत्यंत अभ्यास पूर्व आहे. खूप मेहनत घ्यावी लागली असेलच आपल्या मेहनतीबद्दल धन्यवाद ही स्वप्नांची दुनिया आपल्या स्वप्नांची पुरती करो ही सदिच्छा! – असे आपल्या पत्रातून श्री. एस. आर. पाटील, हिंगोली यांनी कळविले आहे.

अश्या प्रमाणेच श्री. बी. बी. लाखकर, हायकोर्ट वकील, औरंगाबाद, श्री. सुमेध रिसबूड, विलेपार्ले(पू.), श्री. प्रकाश चांदे, डोंबिवली, श्री. अ. ज. रोडे, वकील, हिंगोली, श्री. भाले, वकील, हिंगोली, श्री. एस. डी. देव, परभणी, श्री. एस. एच. शिरोडकर, पुणे आणि आणखीन बरेच या साऱ्यांनी ‘स्वप्नांची दुनिया’ एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणी शास्त्र संमत, धरणी वाचनीय व भाषा प्रासादिक आहे. सहज सरळ व सराईत शब्दांमुळे पुस्तकाची भाषा शैलीदार व रोचक बनली आहे. आणखी एक वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे अत्यंत अभिनव विषयांतील एक अभिनव व एकमेव पुस्तक म्हणून विशेष अभिनंदन!

61 Comments

  • दिवळीमध्ये लक्ष्मी पूजेचा दिवशी पाल दिसणे शुभ कि अशुभ

  • स्वपनामधे विंचु मारणे यांचा काय बोध ध्यावा ?

  • मला माझा ४ वर्षाचा मुलाला साप चावल्याचे स्वप्नपहाटे पडले पलेअसे त्याचा अर्थ सांगा मी आत्ता खूप घाबरले आहे

    • मला पण असे स्वप्न पडले आहे , काय सुचवलं

  • स्वप्नात वटवाघळे दिसल्यास अर्थ काय?

  • स्वप्नात देवाची मूर्ती सापडतात याचा निश्चित अर्थ काय

  • १.स्वप्नात मातीखाली अडकलेलेचिल्लर पैसे स्वतःला सापडणे हे साधारण सकाळी 7-8च्या दरम्यान पडले त्याचे फळ काय व केव्हा? २.स्वप्नात वर पडलेल्या स्वप्नाबरोबरच इसक्रीम पार्लर सारख्या पेटीतून मे स्वतः सोन असलेली डबी चोरणे हे देखील सकाळी 8-8:30 दरम्यान पडलेले स्वप्न आहे याचे फळ काय व केव्हा? 3. हातात विमान छोटे दोन विमान आहे आणि त्याच्या पंखाला पकडून हवेत उडताना स्वतःला बघणे आणि हवे तेव्हा खाली येणे हे संध्याकाळी ६-७ वाजेदरम्यान पडलेले स्वप्न आहे त्याचे फळ काय व केव्हा? 4. क्रिकेट मॅच बघताना भूक लागलेली असल्याने स्वतःला फोडणीचा पिवळा भात खत असताना बघणे

    • मला स्वप्नात मी नटलेली आहे असे स्वप्न पडले आणि माझ्या वडिलांन कडुन मि गजरा घेऊन तो माळला माझे वडील नाही आहेत 2 वर्ष झालीत त्याना जावून काय अर्थ असेल please Ripley me

  • स्वप्नामध्ये रेल्वे प्रवास करत असताना दूसर्या रेल्वे चा अपघात बघितला

  • दुपारच्या वेळची स्वप्नांना अर्थ असतो का? हे स्पष्ट करून सांगावे

  • जर मुव्हीमध्ये पाहिलेल्या घटना किंवा तूम्ही एखाद्या जास्त विचार करणारी घटना स्व्प्नांत दिसत किवा जाणवत असेल तर काय समजायचे ?
    जर तुम्हाला तणाव चिंता वात कफ पित दोष असतिल आणि वाईट स्वप्ने येत असतिल तर काय?

  • Hello Sir,
    Thanks for such a information.
    I have some doubts can you please give me ans:
    1. in most of dream I saw myself dead and this is happening to a big accident can you send reply what is meaning of this.
    2. same thing in dream I saw my parents are dead most of time I saw this same dream. Please tell me meaning of this.

  • स्‍वप्‍नात केऴ्‍याची झाडे दिसणे

  • मला पहाटे पडलेले स्वप्न : प्रथमतः मला स्वप्न पडले तेव्हा मला माझे घर सापडत नव्हते, म्हणजे मी रस्ता विसरलो होतो, तद्नंतर मी गरिबी मुळे साडी उसनी घ्यायला गेलेलो साडी चा रंग अर्धा निळा अर्धा सफेद, आणि साडी घेऊन येणार लोक माझ्याकडे बघून हसत होते, आणि शेवटी माझे राहते घर अचानक एक दोघे जण चढ्या किमतीमध्ये मागितले एक 45 लाख म्हणतो तर दुसरा 80 लाख म्हणतो, …..ह्या स्वप्नाचा अर्थ काय आहे ते कृपया सांगा,

    माझी बरीचशी स्वप्ने आहे तशीच खरी होतात, पण ती अगोदर लक्षात न राहता घटना घडत असताना पूर्ण आठवतात । काही छोटी छोटी स्वप्ने आहे तशी लक्षात राहते आणि खरी पण होतात .

  • दुपारच्या झोपेच्या स्वप्नात दाढ पडलेली दिसणे.याचा अर्थ वाईट कि चांगला ?

  • Ekadyala swapnat hirvi sadi ani gajre ani hirwa chuda ghatleli tichich maitrin disne yacha kay arth hoil

  • Swpnat swatacha vadhdivas disla ….maje aai vadil disle…ani maje Kaka kaku doghe je ata ya Jagat nahit…te disle….ani me tyana bagun radat ahe…Kai ahe ya swpnacha Arth…?
    Swapn sakali 7-8 Chya darmyan padle ahe…

  • मला स्वप्नात नेहमी वाहते पाणी दिसते कधी गढुळ तर कधी स्वच्छ कधी नदी तर कधी धबधबा याचा काय अर्थ होतो

  • मला स्वप्न पडलं..त्यात माझ्या ७ वर्षाच्या मुलाने माझ्या पत्नीचे मंगळसूत्र आणि हार बाहेर एका रस्त्यावर चा टपरी (दुकान) ला अडकाऊन ठेवलं होतं…अस मला स्वप्नात दिसल… कृपया याचा अर्थ आपण कळवा..

  • Swapnat satat nag disto,Ani te hi khup sare,Ani mi tyana ghabarun oradatana diste…aas ka?? Plz reply..

  • Mazya swapnat mazi Aai varli ani nantr swapnatch ti jivant disli yacha arth ky ho to.

  • स्वप्नात काली साडी नेसून एक स्त्री हसून हात ओढणे पण चेहरा दिसत नव्हता याचा अर्थ काय कृपया मला याचा अर्थ सांगा

  • mala swapnat ekach weli anek mrut kawle rastyawar padlele disle, kahi kawlyanche mas disle.. Yacha arth kay asu shakto? Swapn madhya ratri nantar padle ahe.

  • वव्यक्ती पुसट पण ओळखीची, मोठ्या शेळी ची बैलगाडी चालवने व्यक्ती ला घेवुन आणि अंब्याची बाग आणि अंबे लपवुन न्यायचा विचार अस का?????

  • स्वप्नांत मेलेली पाल दिसणे हे शुभ आहे की अशुभ कृपया हे सांगावे याचा अर्थ काय होतो आणि हे स्वप्न तिनिसांजेला पडला होत पण तरी सुद्धा मला हे जाणून घेयचा आहे

  • गाढवाचं पिल्लू बोटाला चगळतं आहे.वेळ रात्री १.५५

  • आदरणीय सर
    सापणात पूरामध्ये झाडू मारून कचरा बाजूला करत होतो मी तेव्हा शेतात होयो व अचानक पूर वाढला तर मी व माझी पत्नी व माझे बाबा आम्ही कमर भर पाणी आलं होतं पुरामध्ये तेव्हा अंगणात होतो घरी पुरामध्ये कारण कळवा

  • स्वप्नामध्ये पूर दिसणे, व 90 अंश कोनाच्या पायरीवरून सूसाट उयरणे, म्हणजे काय असेल नेमक

  • वरील लेखकाने स्वप्नाचे अर्थ बऱ्याच ठिकाणी चुकीचे दाखवलेले आहे. माझे असे म्हणणे नाही की सर्व चुकीचे आहे, पण बऱ्याच अंशी चुकीचे अर्थ सांगितलेले आहे. परत एकदा लेखकाने स्वप्नांच्या अर्थाच्या बाबत योग्य विश्लेषण करून मगच लिहावे. आणि असे अजिबात नाही की स्वप्नांचे अर्थ व अनर्थ टाळता येत नाही, योग्य उपाय केल्यास अनर्थ टाळता येतात. फक्त स्वप्नांची घोषणा केल्यास चांगल्या स्वप्नांचे अर्थ सिद्धी पावत नाही, व वाईट स्वप्नांचा पाहिजे तेवढा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

  • Sir, nice & good information ,तुमी मेल ला रिप्लाय देवो शकता का. (Swapncha arha mail varon सांगो शकता का ). धन्यवाद

  • Mala swapnat nehemi kaala an motha naag disto to mala chavayla yeto an lagech aapli vaat change krto… Ani bail marayla nehemi mazya pathi lagto . Hyacha Aartha kay .plz reply . Must……??

  • Maj nav priyanka tikhe mla aaj swapan padale pahate yeshu mla Akashat ghevun jat hota tithe varti khup kross disale ani ek kala kavala plate madhe khatna disala. ase swapan padale please yacha arth kay hoto sanga naa.ajch phate padale ahe swapan.02.02.2020

  • Swapanat pahile ek pranyala mulaga pakadat hota dyalna tyacha dat lagala tynantar husbandchya dokyavar ek gol gol pakshi udat hota mi oradale vatvaghul husband tyala marat Astana beshudh zale yacha arth kay

  • मला भारत स्वतंत्र होत असतांना दिसले स्वप्नात आणि गांधीजींनी ऐका डोंगरावर चढून सर्वाना सांगितलं की आपल्याला संविधान नुसार चालावे लागेल

  • Mala swapnat Mala hatala kutra chavla he swapn padle plz tyacha mening sanga

  • Mazya mulala jivant sapavar pay /foot tyane chukun dilyache disale. Andhar hota tyamule sap kala disala. he swapn changle ki vait aahe. Please reply.

  • मला नेहमी महादेव ची पिंडी स्वप्नात दिसते तर याचा काय परिणाम आहे ?

  • Maje vadil varle aahet. Tr te mala swapnat aalele disle aani aai ne haldi kunku samarambh thevla hota. Sarv natevayik aale hote amche. 2 vela ase swapn mala padle. Yacha artha Kay?

  • mala swapnat sarvikade ghan aani daldal aani khup ghan disali.yacha arth kay asu shakto

  • स्वप्नात भावला विहिरीच्या पाण्यात मृत अवस्थेत पाहाणं.ह्या स्वप्नाचा अर्थ काय?